By  
on  

“उगीचच काय भांडायचंय? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय?

प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या वेडिंगचा शिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे उगीचच काय भांडायचंयगोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, उगीचच काय भांडायचंयआज प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी लिहिले असून त्यांनीच ते गायले सुद्धा आहे.

आपल्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण नेहमीच आणि उगीचच भांडत असतोत्या भांडण्याला काही कारण पण नसते, पण उगीचच आपण सगळ्यांन बरोबर भांडत असतो. हेच या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित वेडिंगचा शिनेमामध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

वेडिंगचा शिनेमाच्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. आयुष्यावर बोलू काहीमधील सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. उगीचच काय भांडायचंयगोल गोलपुन्हा पुन्हातेच तेचकाय बोलायचंय?...” हे गाणेही त्यातीलच एक आहे.

वेडिंगचा शिनेमामध्ये मुक्ता बर्वेभाऊ कदमशिवाजी साटमअलका कुबलसुनील बर्वेअश्विनी काळसेकरप्रवीण तरडेसंकर्षण कऱ्हाडेप्राजक्ता हणमगरयोगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेतशिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

वेडिंगचा शिनेमाची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी यांची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्मआम्ही दोघीशिक्षणाच्या आयचा घोहापूस,आयडियाची कल्पनातुकारामआजचा दिवस माझाहॅप्पी जर्नीकॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.

https://www.youtube.com/watch?v=XduVolIkB2M

या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथापटकथासंवादसंगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहेयाचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive