By  
on  

Photos : रुपालीच्या ह्या फोटोशूटमधून दिसली मीरेची कृष्णभक्ती आणि उत्कट प्रेम

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. 

गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. प्रत्येकीची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय. 

यंदा आई कुठे काय करते ह्या मालिकेतील संजना म्हणून घाघरांत पोहचलेली अभिनेत्री रुपाली भोसले खास नवरात्री स्पेशल फोटोशूट चाहत्यांशी शेअर करतेय. 

 

 

 

मीरा बनलेली संजना फेम सर्वांची लाडकी अभिनेत्री रूपाली भोसले चाहत्यांची मनं जिंकतेय.  ती कृष्णभक्तीत लीन झाली आहे. 

 

 

पिवळ्या रंगाच्या ह्या पेहरावात रुपाली हुबेहुब कृष्णासाठी आतुर झालेल्या मीरेसारखीच दिसतेय. रुपालीच्या ह्या आगळ्या संकल्पनेचं कौतुक करत चाहत्यांनी ह्या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

 

 

 

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच आज पिवळ्या रंगाचे पोशाख परिधान करण्यास प्राधान्य दिलं जातं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive