By  
on  

कभी हँसी के झरने देखें है क्या, बहते हुए?, म्हणत विनोदवीरांनी शेअर केला हा सुंदर फोटो

 ‘चला हवा येऊ  द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान  निर्माण केली आहे. आजवर अनेक एपिसोडमधून  गेली कित्येक वर्ष सातत्याने ते  प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन  करतायत. ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रत्येच भागाची रसिकांना आतुरता असते.  सागर कारंडे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे हे विनोदवीर कोणत्या रुपात दिसणार याची कायमच उत्सुकचा असते. 

थुकरटवाडीच्या मंचावर ह्या विनोदवीरांना पाहणं आणि हास्याच्या लाटेवर मनसोक्त स्वार होणं हा अनुभव प्रत्येक प्रेक्षक घरबसल्या यांच्यामुळेच घेऊ शकतो. पण नुकतंच हे विनोदवीर त्यांच्या ख-या-खु-या रुपात पाहायला मिळाले.तेसुध्दा इन वन फ्रेम. जशी ह्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रंगते तशीच त्यांच्यात ऑफस्क्रीनसुध्दा घट्ट मैत्री पाहायला मिळते.  हे सर्वचजण एकत्र खुपच गोड दिसतायत. एकमेकांसोबतचा हा फोटो पोस्ट करत सर्वांनी छान कवितेच्या ओळीसुध्दा शेअर केल्या आहेत. 

हा चला हवा येऊ द्याचे विनोदवीर सर्वांचा  एकत्रित फोटो शेअर करत  म्हणतात, " कभी हँसी के झरने देखे हैं बहते हुए?
बड़े प्यारे लगते हैं। बूँद-बूँद में बादल समाए लगते हैं !
पत्थर रोके या बिछा दो काँटे, बहते रहते खुशियाँ बाँटे।
कभी हँसी के झरने देखें है क्या, बहते हुए?
बड़े प्यारे लगते हैं, हँसते हुए। "

 

 

 

 

 

 

चाहत्यांनी लाडक्या विनोदवीरांच्या ह्या गोड फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive