By  
on  

नवरात्रौत्सवानिमित्त मृण्मयी देशपांडेने शेअर केलं हे खास फोटोशूट

एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी  देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा नुकत्याच भेटीला आलेल्या 'मन फकी'रा या सिनेमातून सिध्द केलं आहे. आजच्या तरुणाईचा नात्यांचा झालेला गुंता तिने या सिनेमाद्वारे अलवार उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न करत रसिकांची मनं जिंकली. लवकरच मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. 

गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयीनेसुध्दा असंच एक सुंदर फोटोशूट नुकतंच शेअर केलं आहे. 

 

 

 

पिवळ्या रंगाच्या ह्या घेरदार फ्रीलवाल्या  ड्रेसमध्ये मृण्मयीचा दिलखेचक अंदाज पाहून तुम्ही घायाळ नाही झालात तरच नवल. 

 

 

 मृण्मयी खुपच आकर्षक दिसतेय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. तुम्हालासुध्दा मृण्मयीचा हा अंदाज नक्की आवडेल यात शंका नाही. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive