By  
on  

म्हणून भरत जाधवने सिध्दार्थ जाधवसोबतचा हा खास फोटो केला शेअर

सिनेसृष्टीत सर्व कलाकार हे नेहमीच गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांच्या सुख-दु:खात पाठीशी असतात. त्यांच्यातली दोस्तीसुध्दा जीवाला जीव देणारी असते. आता हेच उदाहरण पाहा ना, भरत जाधव आणि सिध्दार्थ जाधव यांचं. दोघेही महाराष्ट्राचे लाडके कलाकार.

 नाटकांपासूनची म्हणजे कारकिर्दीचा श्रीगणेशा केल्यापासूनची ह्या दोघांची मैत्री,आजतागायत तशीच आहे. आज सिध्दूचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने भरत जाधवने एक खास फोटो शेअर करत लाडक्या दोस्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छ् दिल्या आहेत.

 

 

बकुळा नामदेव घोटाळे ह्या सिनेमातला हा ह्या दोघांचा एक सीन आहे. भरतने तो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.  आमच्या मुकादमला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं भरत जाधव या पोस्टमध्ये म्हणतोय.


दोघांनी अनेक सिनेमांमधून एकत्र धम्माल उडवून दिली होती. जत्रा हा सिनेमासुध्दा ह्या दोघांच्या अफलातून केमिस्ट्रीने सजला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive