By  
on  

नवरात्रौत्सवानिमित्त हटके फोटोशूटमधून मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेने वेधलं चाहत्यांचं लक्ष

नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. प्रत्येकीची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

नवरात्रौत्सवानिमित्त मिसेस मुख्यमंत्री फेम सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे हिने स्पेशल फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

नवरात्रीच्या शुभेच्छा देताना देवीच्या विविध रुपांचं दर्शन अमृताने चाहत्यांना घडवलं आहे. 

 

हे अपर्णा देवीचं रुप अमृताने धारण केलं आहे. ती म्हणते, हे अपर्णे , तू प्रचंड तपाने तापून ऑस्ट्रेलियातील वणव्यातून प्राणीमात्रांना वाचवलेस,तसेस आमच्या जीवनातल्या वणव्यांपासून रक्षणं कर.

 

 

हे वरुणी देवीचं रुप तिने धारण केलं आहे. ती म्हणते, निसर्गात जेव्हा 'निसर्ग' नावाची चक्रीवादळ रूपी आपत्ती निर्माण झाली, तेव्हा या वारूणीनेच आपत्ती रूपाने गर्जना केली

 

ही संकल्पना खुपच कल्पक आहे. चाहत्यांनासुध्दा खुप भावतेय. 

 

कालरात्री देवीचं रुप धारण केलेली अमृता म्हणते, हे कालरात्री, तुझ्या असहाय मुलींची या महारात्रींमध्ये तू रक्षा कर . ताकदवान नराधमांना तू तुझ्या त्रिशूलाचा पराक्रम दाखवून दे .

 

 

ह्यात अमृताने विद्येची देवता  सरस्वती देवीचं रुप धारण केलं  आहे. ती म्हणते, हे सरस्वती, तू शिक्षिका , अनादी अनंतविद्या शिकविणारी ,तूझ्या आशीर्वादाने आम्ही प्रगतीशील राहू ।

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive