‘नाळ’ मधील चैत्या पोहोचला थेट लंडनला, दिसणार या सिनेमात?

By  
on  

रिंकू राजगुरु, प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे कलाकार सध्या लंडनमध्ये धमाल करतानाचे विविध फोटो व्हिडियो शेअर करत असतात. पण या कलाकारांमध्ये आणखी एक बाल कलाकारही आहे. 

 

नाळ सिनेमातील चैत्याची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे श्रीनिवास पोकळे.

 

 

श्रीनिवास सध्या लंडनमध्ये आहे. रिंकूने, प्रार्थनाने त्याच्यासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. प्रॉडक्शनकडून मात्र श्रीनिवास या सिनेमात असण्याबाबत कोणतीही बाब समोर आली नाहीये. पण एकंदरीत हे फोटो पाहता चैत्याही या सिनेमात झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Recommended

Loading...
Share