पाहा Video : लंडनमध्ये शूटींग एन्जॉय करतेय अभिनेत्री रिंकू राजगुरु

By  
on  

 सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. 'कागर', 'मेकअप'  या सिनेमानंतर 'हण्ड्रेड' या  वेबसिरीजमधून तिच्या  अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. आता रिंकू थेट लंडनला पोहचलीय...कशाला म्हणून काय विचारता, तर तिच्या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी ती अनलॉकमध्ये लंडनला ‘छूमंतर’ झालीय. तिच्या आगामी सिनेमाचं नावच ‘छूमंतर’ आहे. 

लंडनमधलं सिनेमाचं शूटींग रिंकू प्रचंड एन्जॉय करतेय, म्हणूनच एक छानसा व्हिडीओसुध्दा तिने चाहत्यांशी शेअर केला आहे. तोसुध्दा चक्क साडीमध्ये. ह्यात ती खुपच गोड दिसतेय. रिंकूला लंडनमध्ये शूटींग खुप आवडल्याचं तिच्या सोशल मिडीया पोस्टवरुन लक्षात येतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Always wear your invisible crown#shootingtime #enjoyin.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

‘छूमंतर’ ह्या सिनेमात रिंकू सोबतच अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. तसंच नाळ सिनेमातील सर्वांचा लाडका बालकलाकार चैत्या फेम श्रीनिवास पोकळेसुध्दा झळकणार आहे. 


सर्वांनाच ‘छूमंतर’ सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. 
 

Recommended

Loading...
Share