By  
on  

विनोदांचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ह्या सिनेमाद्वारे केलं होतं सिनेसृष्टीत पदार्पण

मराठी विनोदी सिनेमे म्हटलं की, सर्वांच्या लाडक्या लक्ष्याचे सिनेमे पटापट ओठांवर येतात. टेन्शन विसरायला लावणारा आणि मनमुराद हास्याच्या लाटेवर स्वार करायला लावणार लक्ष्या म्हणजेच चतुरस्त्र अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.  विनोदाचे अफलातून टायमिंग आणि चेहऱ्यावरील तेवढेच विनोदी हावभाव या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. 

१९८५ साली 'लेक चालली सासरला' या सिनेमाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी 'धुमधडाका', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', ‘बजरंगाची कमाल’, ‘हमाल दे धमाल’. ‘कुठे कुठे शोधू मी तुला’, ‘पछाडलेला’, ‘शेजारी शेजारी’ असे एकापेक्षा एक सिनेमे केले. 

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. हम आपके है कौन, साजन, मैने प्यार किया यांसारख्या अनेक सिनेमांमधून लक्ष्मीकांत यांच्या सहाय्यक भूमिका गाजल्या. 

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यासोबत अनेक वर्षे मराठी चित्रपटाला सुपरहिट चित्रपट देऊन रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.

 

प्रत्येकाच्या आयुष्यात हसू खुलवणारा हा अवलिया मात्र २००४ साली वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. मात्र आपल्या कलाकृतींमधून लक्ष्मीकांत बेर्डे आजही आपल्यात जिवंत आहेत आणि ते कायम अजरामर राहतील.


या महान कलाकाराला पिपींगमून मराठीतर्फे जन्मदिनी मानाचा मुजरा.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive