By  
on  

अभिनेता अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, शिवसेनेतून पडले बाहेर

‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकांतून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमोल यांच्या प्रतिमेचा संबंधित पक्षाला नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अमोल यांंनी शिवसेनेतून बाहेर पडत हा निर्णय घेतल्याचं समजत आहे. आपल्या या पक्ष प्रवेशावर अमोल म्हणतात, सध्याच्या युवकांना दिशा देण्यासाठी शरद पवारांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. हेच जाणून मी या पक्षात प्रवेश केला आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive