By  
on  

बॉलिवूड,क्रिकेटर्ससह सगळ्यांनाच बसतोय 'डोक्याला शॉट', का ते जाणून घ्या

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 'डोक्याला शॉट' चित्रपटाचाच बोलबाला आहे. 'डोक्याला शॉट' चित्रपटाचा टिझर आल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. ट्रेलर आल्यावर तर ही उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बॉलिवूडमधील संजय दत्त, जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, अमोल गुप्ते,  जॉनी लीवर, चंकी पांडे यांच्यासह अजिंक्य देव, स्वप्नील जोशी, रवी जाधव, संतोष जुवेकर, प्रवीण तरडे या मराठी कलाकारांसोबतच पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर, सूर्यकुमार यादव या  क्रिकेटपटूंनी  आणि अनेक दिग्गजांनी  या चित्रपटाला शुभेच्छा देत, सर्व रसिकांना हा चित्रपट नक्की पाहा, अशी आग्रहावजा विनंती केली आहे. या संदर्भातील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक हटके प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळणार आहे.  मराठी आणि तामिळ या दोन भिन्न संस्कृतीचा आगळावेगळा मिलाप अतिशय सुंदर आणि धमाल विनोदी पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.  बॉलिवूड कलाकारांना देखील भुरळ घालणारा हा 'डोक्याला शॉट' चित्रपट १ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शिवकुमार पार्थसारथी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि  'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' यांनी या अफलातून चित्रपटाची निर्मिती केली आहे.

[video width="848" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/03/Amol-Gupte.mp4"][/video]

 

[video width="480" height="848" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/03/Johnny-lever.mp4"][/video]

 

[video width="480" height="592" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/03/suraj_yaduvanshi_4169_53509426_383307302223927_4576559022806663168_n.mp4"][/video]

[video width="640" height="800" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/03/suvratjoshi_53673092_657452154657847_5291077599009701888_n.mp4"][/video]

Recommended

PeepingMoon Exclusive