By  
on  

Video : अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम देणार कॉमेडीच्या महासम्राटांना मानवंदना

मराठी सिनेसृष्टी आणि विनोदी सिनेमांसाठी  विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे आणि द्व्यर्थी विनोदाचा सम्राट दादा कोंडके यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. मराठी विनोदी सिनेमा हा विषय ह्या हास्यसम्राटांना वंदन केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यांनी  महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि एक काळ गाजवला. या दोन महान विनोदवीरांना मानवंदना देण्यासाठी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स  २०२० मध्ये अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम यांनी रंगमंचावर बहारदार नृत्य सादर केली. 

या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स. या खास परफॉर्मन्ससाठी मयुरेश पेमने दादा कोंडके यांची वेशभूषा केली होती तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र अभिनय बेर्डे याने लक्ष्याची वेशभूषा केली. या दोघांनी मिळून त्यांच्या सदाबहार गाण्यांवर जबरदस्त ताल धरला. प्रेक्षक देखील त्यांचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. 

 

 

 

 

 “बाबांचा वाढदिवस नुकताच 26 ऑक्टोबरला  होऊन गेला आणि त्यांना मानवंदना देण्याची संधी मला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सने दिली याचा मला आनंद आहे. त्यांची सगळीच गाणी ही खूप लोकप्रिय आहेत, त्यातील काही निवडक गाण्यांवर आपल्या स्टाईलने परफॉर्म करताना मला आनंद होतोय."  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive