By  
on  

पाहा Video: गश्मीर महाजनीची नवी सुरुवात, झळकतोय ह्या हिंदी मालिकेत

मराठी सिनेसृष्टीचा हॅणड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी नेहमीच नवनव्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांसमोर येत असतो. अभिनयाप्रमाणेच डान्सवरही त्याचं जीवापाड प्रेम आहे. लवकरच गश्मिर एका नव्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. 
तुम्हीसुध्दा उत्सुक असाल की गश्मिर कोणत्या मराठी सिनेमा अथवा वेबसिरीजमधून  आपल्या भेटीला येतोय, तर असं अजिबातच नाहीय. एका नव्या माध्यमातून रसिकांसमोर तो झळकतोय. 

गश्मिर लवकरच टेलिव्हिजनवर डेब्यू करतोय. ही त्याची हिंदी मालिका आहे. स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित होणा-या आगामी ‘इमली’ या मालिकेत गश्मिर नायक साकारतोय. 

 

या हिंदी प्रोजेक्टबद्दलची खास पोस्ट करत त्याने ह्या मालिकेचा प्रोमोसुध्दा शेअर केला आहे. तो चाहत्यांना आनंदवार्ता देताना लिहतो, “नवी सुरूवात ... १६ नव्हेंबर पासून रोज आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज. फक्त हाॅटस्टार आणि स्टार प्लस वर. चित्रपट असो वा वाहिनी ... माणूस तोच आहे भेटूया.”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नवी सुरूवात ... १६ नव्हेंबर पासून रोज आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज. फक्त हाॅटस्टार आणि स्टार प्लस वर. चित्रपट असो वा वाहिनी ... माणूस तोच आहे भेटूया. नयी शुरुआत ... १६ नव्हंबर से हर रात आपका मनोरंजन करने आ रहा हूॅं। सिर्फ स्टार प्लस और डिसनी हाॅटस्टार पर

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

 

शहरातून गावात आलेला तरुण आणि त्याची गावात झाललेया तरुणीशी भेट , असं काहीसं गाव व शहरातील अंतर याच्यावर आधारित इमली या मालिकेचं कथानक आहे. 

गश्मिरच्या चाहत्यांना त्याची ही नवी सुरुवात पाहण्याची उत्सुकता लागलीय. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive