By  
on  

हा अभिनेता म्हणतो, 'या शहराबरोबर काही हिशोब बाकी नाही. तरीही पाय निघत नाहीये'

टेलिव्हिजनवरुन स्वत:ची ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता  सुव्रत जोशी मराठी सिनेमांमधूनही आपल्या  अभिनयाची चुणूक दाखवतो.  शिकारी, डोक्याला शॉट, मन फकीरा हे सुव्रतचे गाजलेले सिनेमे. 

अनलॉक काळात  गेले काही दिवस लंडनमध्ये आगामी सिनेमाचं शुटींग करणारा सुव्रत अखेर मायदेशी परततोय. तेसुध्दा तब्बल सात- आठ महिन्यांनी.
लॉकडाऊनचा संपूर्ण काळ सुव्रत हा पत्नी अभिनेत्री सखी गोखलेसह लंडनमध्येच होता. सखी आधीपासूनच लंडनमध्ये होती. त्यामुळे मन फकीरा सिनेमाच्या प्रदर्शनानंतर तो लंडनला गेला. लॉकडाऊनच्या आधीच सुव्रत सखीकडे पोहचला होता, तो आत्ता इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा मायदेशी येतोय.

लंडनमध्ये बराच काळ घालवल्याने भावूक झालेल्या सुव्रतने एक भावनिक पोस्ट या शहराला  बाय बाय करताना लिहली आहे. तो म्हणतो, "लंडन हे शहर पुन्हा एकदा लॉक डाउन मध्ये जात आहे आणि मी अखेरीस मायदेशीची वाट धरली आहे. या अत्यंत अवघड वर्षात या अद्भुत शहराने अत्यंत सुंदर, सुखावणारे, प्रेमाचे आणि साक्षात्काराचे काही क्षण दिले. माझे खरंतर आता इथे काही नाही. माझे सर्व प्रिय लोक माझ्या प्रिय मायदेशी परतले आहेत. माझे इथले काम संपले आहे. या शहराबरोबर काही हिशोब बाकी नाही. तरीही पाय निघत नाहीये. किती वर्षांनी असा पोटात भोवरा फिरतोय आणि कंठ दाटून आला आहे. या शहराबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे पण ते सगळं पुन्हा कधीतरी!प्रेम आणि कृतज्ञता यांनी मन काठोकाठ भरले आहे. आतापुरते See you mate!" 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लंडन हे शहर पुन्हा एकदा लॉक डाउन मध्ये जात आहे आणि मी अखेरीस मायदेशीची वाट धरली आहे. या अत्यंत अवघड वर्षात या अद्भुत शहराने अत्यंत सुंदर, सुखावणारे, प्रेमाचे आणि साक्षात्काराचे काही क्षण दिले. माझे खरंतर आता इथे काही नाही. माझे सर्व प्रिय लोक माझ्या प्रिय मायदेशी परतले आहेत. माझे इथले काम संपले आहे. या शहराबरोबर काही हिशोब बाकी नाही. तरीही पाय निघत नाहीये. किती वर्षांनी असा पोटात भोवरा फिरतोय आणि कंठ दाटून आला आहे. या शहराबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे पण ते सगळं पुन्हा कधीतरी!प्रेम आणि कृतज्ञता यांनी मन काठोकाठ भरले आहे. आतापुरते See you mate! #sula #sulaspeaks

A post shared by Sula (@suvratjoshi) on

 

सुव्रत जोशीसोबतच या आगामी मराठी सिनेमात  रिंकू राजगुरु, प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना आणि बालकलाकार चैत्या फेम श्रीनिवास पोकळेसुध्दा झळकतायत. सर्वांनाच आता या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive