By  
on  

धनश्री काडगावकरनेसुध्दा पोलका डॉट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

पोलका डॉट ड्रेसमध्ये फोटोशूट करत आपल्याकडे गोड बातमी आहे, हे सांगण्याचा ट्रेंड बॉलिवूड कलाकरांनी चांगलाच रुजवला. त्यात नेटक-यांनी त्यांंच्यावर भन्नाट मीम्स करत फिरकीही घेतली. अनुष्का-विराट, करिना-सैफ यांनी आपल्या घरी नवा पाहुणा येतोय हे सांगताना हाच पोशाख होता.

मराठी टेलिव्हिजनवरची तुझ्यात जीव रंगला या सुपरहिट मालिकेतली नंदिता वहिनी म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत प्रसिध्द झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे. म्हणूनच तिनेसुध्दा याच पोलका डॉट ट्रेण्डमधलं खास फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

 

पतीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धनश्रीने ही गूड न्यूज सर्वांना दिली होती. त्यांचा हा गोड व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर धनश्रीने पुन्हा आता बेबीबंपसह एक नवं फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. ह्यात धनश्री खुपच क्यूट दिसतेय. 

 

 

धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive