By  
on  

या मराठी कलाकरांनी बॉलिवूड बादशाहसाठी शेअर केली खास पोस्ट

एका सामान्य घरातून आलेला मुलगा आपल्या अभिनयाच्या जोरावर  संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करतोय. ‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान याचा आज वाढदिवस.

विविध चित्रपटातून राहुल, राज, डॉन अशा भूमिका साकारणाऱ्या किंग खानने करोडो चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. भारतात आणि भारताबाहेर शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे. सुरुवातीला अभिनयाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या शाहरुखचा किंग खानपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्याने दूरदर्शनवरील फौजी, सर्कस या कार्यक्रमांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज शाहरुखने अभिनयाच्या जोरावर मेहनतीने स्वत:च्या साम्राज्य उभं केलं आहे. किंग खान हा अनेकांची प्रेरणा आहे. नवोदित कलाकारांपासून ते विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द असलेल्या कलाकारांचासुध्दा. 

मराठी सिनेसृष्टीतील कलाकरांनीसुध्दा शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या सोबतचा खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सुपरस्टार स्वप्निल जोशीनेसुध्दा खास फोटो शेअर करत लिहलं आहे, "माझ्यासारख्य स्वप्न पाहणा-या कोट्यावधींची प्रेरणा झाल्याबद्दल धन्यवाद एसआरके. तुझ्या आगामी प्रोजेक्टची चातकासारखी वाट पाहतोय."

 

तर सायली संजीवनेही किंग खानसोबतचा एक कॅन्डीड क्षण चाहत्यांशी शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive