By  
on  

आणि मराठी कलाकारांची ही टीम लंडनमधून झाली 'छूमंतर'

'छूमंतर' या हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणा-या आगामी सिनेमाच्या  चित्रीकरणासाठी अनेक कलाकार गेले काही दिवस लंडनमध्ये होते. अनलॉक काळात सुरु असलेल्या त्यांच्या या शूटींग शेड्यूलमधून ते चाहत्यांशी लंडनमधले अपडेट्स शेअर करत होते. या सिनेमात अभिनेत्री प्रार्थाना बेहरे आणि रिंकू राजगुरु यांच्यासोबतच अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनासुध्दा झळकणार आहेत. याशिवाय नाळ सिनेमामुळे महाराष्ट्राचा लाडका झालेला चैत्या फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेसुध्दा भूमिका साकारतोय. ही सर्व सिनेमाची टीम नुकतीच लंडनहून मायदेशी परतली आहे. 

अभिनेता ऋषी सक्सेनाने ह्या सिनेमाच्या संपूर्ण टीमचा एक झक्कास फोटो शेअर केला आहे. ऋषीने काहे दिया परदेस या मालिकेतून रसिक प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. त्यानंतर आता तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Great place , great shoot , great people . VBT

A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official) on

 

सर्वांनाच ह्या सिनेमाच्या फर्स्ट लुक सोबतच कथानकाचीसुध्दा उत्सुकता आहे. लंडनमध्ये ह्या कास्टने चित्रीकरण पू्र्ण केल्याने चाहत्यांना् या आगामी सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive