‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते साध्या, गोड लतिकाने. अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाच्या भूमिकेत दिसते आहे.
अभ्या आणि लतीच्या आंबटगोड केमिस्ट्रीने मालिका अधिक रंगतदार बनली आहे. अपघाताने लग्नाच्या बेडीत बांधले गेलेल्या अभ्या आणि लतीमध्ये प्रेम फुलणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
या मालिकेत लतिका साकारत असलेल्या अक्षयाने एक खास आठवण शेअर केली आहे. अक्षयाने यावेळी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या गोवा व्हेकेशनचा आहे. या फोटोच्या नंतर अगदी काही वेळातच तिला ‘सुंदरा मनामध्ये भरली’ च्या फायनल ऑडिशनसाठी बोलावलं गेलं होतं. हा तिच्यासाठी टर्निंग पाँईंट ठरला होता. पण यासाठी मात्र तिला तिची गोवा ट्रीप अर्धवट सोडून यावं लागल्याचंही तिने यावेळी चाहत्यांशी शेअर केलं.