By  
on  

Video: आला रे आला रवी जाधव यांच्या 'रंपाट'चा टीझर आला

महाराष्ट्रातील प्रेक्षकांची आवड अचूक ओळखून त्यांना नेहमीच नवनवीन सिनेमे देणारे चतुरस्त्र दिग्दर्शक रवी जाधव आता लवकरच 'रंपाट' हा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'रंपाट' सिनेमाचा टीझर नुकताच उलगडला आहे. हा टीझर सोशल मिडीयावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत रवी जाधव म्हणतात, "अचाट स्वप्नांच्या मागे सुसाट धावणाऱ्या अस्सल मातीतील मराठी मुलांची कथा ‘रंपाट’!!! सादर आहे झी स्टुडियोज् आणि अथांश कम्युनिकेशन्स प्रस्तुत, रवि जाधव दिग्दर्शित ‘रंपाट’ या चित्रपटाचा लै भूंगाट टिजर!!!" पण हे मराठी रॅप सॉंगची झलक पाहता अद्याप तरी सिनेमाची कथा आणि यातील कलाकार गुलदस्त्यातच आहेत.  पण एवढं मात्र नक्की की हा सिनेमा कुस्ती या मराठी मातीतल्या खेळावर आधारित आहे.

या सिनेमाचं नाव सोशल मिडीयाच्या आधारे रवी जाधव यांनी यापूर्वी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. ‘रंपाट’ असं हटके नाव रवी जाधव यांच्या आगामी सिनेमाचं असून महत्त्वाचं म्हणजे त्याचं शुटींग कोल्हापुरात सुरु होतं.

https://www.instagram.com/p/Buk3JU6FUID/

झी स्टुडिओज निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' हा सिनेमा येत्या 29 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive