By  
on  

आदिनाथ कोठारे लवकरच ह्या प्रसिध्द बॉलिवूड दिग्दर्शकासोबत घेऊन येतोय नवीन प्रोजेक्ट

मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हंक अभिनेता आदिनाथ कोठारेने आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत दिग्दर्शनातसुध्दा पदार्पण केलं. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या आणि आदिनाथचं दिग्दर्शन असलेल्या पाणी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारसुध्दा मिळाला. सर्वत्रच ह्या सिनेमाचं कौतुक झालं. लवकरच आदिनाथ '83 द फिल्म' ह्या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांची भेटीला येतोय.  कबीर खान दिग्दर्शित ‘83’ मध्ये आदिनाथ पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

तत्पूर्वी आदिनाथ काहितरी खास प्रोजेक्ट सुरु करतोय. पण ते नेमकं कोणतं आणि काय आहे, ह्याबाबतची सविस्तर माहिती त्याने गुलदस्त्यातच ठेवलीय. बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत, काहीतरी नवीन लवकरच, असं त्याने चाहत्यांना सांगितलं आहे. पण तो सिनेमा आहे की वेबसिरीज याबद्दल कोणतीच माहिती उलगडलेली नाही. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#somethingnew ;) @nageshkukunoor @elahe_hiptoola

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

आदिनाथच्या ह्या पोस्टमुळे चाहत्यांना हे आगामी प्रोजेक्ट जाणून घेण्याची बरीच उत्सुकता लागलीय. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive