By  
on  

सुमीत राघवनचे हे ‘अमर अकबर अ‍ॅन्थोनी’ पाहिले का?

अभिनेता सुमीत राघवन याला प्राण्यांची आवड आहे. सुमीतसाठी प्राणीही त्याच्या कुटुंबाप्रमाणेच आहेत. त्याच्या घरातील या सदस्यांसोबतचे फोटो आणि व्हिडियो अनेकदा शेअर करत असतो.  सुमीतकडे तीन पाळीव प्राणी आहेत. त्यापैकी दोन मांजरी आणि एक कुत्रं आहे. मिष्टी, शिफू आणि रिक अशी या तिघांची नावं आहेत.

 

 

मिष्टी आणि रिक या दोन मांजरी आहेत तर शिफू हे कुत्र्याचं नाव आहे. सुमीतने नुकताच या तिघांचा व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये हे तिघेही आराम करताना दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडला ‘अमर अकबर अ‍ॅन्थोनी’ हे गाणं वाजत आहे. हा व्हिडियो पाहून चाहत्यांनी मात्र सुमीतच्या पेट फॅमिलीचं कौतुक केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive