By  
on  

बालदिनाचं औचित्य साधत प्रेक्षकांच्या भेटीला येणार चिंची चेटकीण

14 नोव्हेंबरला बालदिन असतो. या दिवसाचं औचित्य साधत चिंची चेटकिण येत्या 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. झी मराठीवर ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा प्रयोग येणार आहे. या नाटकाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं आहे. यातील प्रसिद्ध चिंची चेटकिणीची भूमिका वैभव मांगले साकारत आहे. 

 

 

याशिवाय कृष्णा वानखेडे, कुणाल धुमाळ, दिलीप कराड, सागर सातपुते, सनी मुणगेकर, संदीप रेडकर, दीपक कदम, सायली बंडकर, श्रद्धा हांडे यांच्याही भूमिका आहेत.  रत्नाकर मतकरी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. 15 नोव्हेंबरला झी मराठीवर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive