By  
on  

आनंदाची बातमी ! कंटेनमेंट झोन बाहेरील थिएटर, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी

राज्यातील करोना हळूहळू का होईना नियंत्रणात येताना दिसतो आहे. या दरम्यान राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील थिएटर्स, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार आहेत. पण हे सर्व केवळ 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. मात्र एरवी प्रमाणे प्रेक्षकांना थिएटर्स, नाट्यगृह, मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे पदार्थ मात्र घेऊन जाता येणार नाही. 

 

 

शासनाच्या या निर्णयाबाबत कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘झिम्मा’ सिनेमातील कलाकारांनी 'झिम्मा' आता लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...’ हे कॅप्शन पोस्ट करत शासनाच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive