By  
on  

सुयश टिळकला झाली होती करोनाची लागण, पोस्ट शेअर करत दिली माहिती

'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेतला शंतनू म्हणून अभिनेता सुयश टिळक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरतोय. ऑनलाईन फुलणारी ही लग्नाची गोष्ट सर्वांच्याच पसंतीस उतरतेय. पण नुकतंच सुयशने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. सुयश टिळकला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. पण व्यवस्थित विश्रांती व  उपचारानंतर सुयश आता पुन्हा नव्या जोमाने शुटींगला सुरुवात करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

सुयश आपल्या पोस्टमध्ये लिहतो, “नमस्कार मी आता व्यवस्थित आहे. पण गेल्या महिन्यात मला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं, मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता, लक्षणं नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 20 दिवस उपचार घेऊन शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन मी आत्ता यातून पूर्णपणे बरा झालो आहे व आता माझं काम पुन्हा सुरु केलं आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि आर्शिर्वादासाठी मनापासून आभारी. 
दिवाळी लवकच येतेय. तर कृपया काळजी घ्या. रस्त्यावर थुंकू नका. त्याने हा विषाणू पसरु शकतो. ताप, अंगदुखी, घसा दुखणे, खवखवणे , वास न येणे, चव जाणे, असाधारण थकवा अशी काही लक्षणं दिसली तर न लपवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जरी काही होत नसेल तरी तुम्ही विषाणू पसरवू शकता.” 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I’m okay and I have recovered. Take care of yourself and loved ones.

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

 

 

सुयशने अलिकडेच बॉलिवूड डेब्यूसुध्दा केला. ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्यासोबत तो खाली-पिली या सिनेमात झळकला. ह्यात सुयशने निगेटिव्ह भूमिका साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive