By  
on  

'परी म्हणू की अप्सरा.. तिची अदा करी फिदा', वैदही परशुरामीचे हे फोटो पाहा

निरागस चेह-याने मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' , 'सिंबा'  या सिनेमांमधील तिच्या अभिनयाची चर्चा झाली. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिने कांचन घाणेकर यांची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर सिंबामध्ये लूक साधा असला तरी छोटी परंतु लक्षवेधी भूमिका वैदहीने साकारत मनं जिंकली. 

वैदही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून वैदही चाहत्यांच्या संपर्कात राहते. झी युवा सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने वैदही नुकतीच एका ग्लॅमरस लुकमध्ये पाहायला मिळाली. 

 

या आऊटफिटमध्ये वैदहीला पाहून तुम्हीही घायाळ होतायत एवढं मात्रं नक्की 

 

 

जणू काही परीच अवतलीय अस्मानीची असंच वैदेहीला पाहून म्हणावं लागेल. 

 

 

लॉकडाऊनंतर वैदहीने झोंबिवली या हॉर-कॉमेडी सिनेमाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या सिनेमात तिच्यासोबत अमेय वाघ आणि ललित प्रभाकर झळकतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive