अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल नेटवर्किंग साईटद्वारे सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या अपडेट्सची तिच्या चाहत्त्यांना खुप आतुरता असते. त्यामुळे तिच्या या सर्व चाहत्यांसाठी अमृता 'टिक टॉक'वर देखील उपलब्ध झाली आहे.
सध्या युथमध्ये प्रसिध्द असलेल्या या 'टिक टॉक' चे फॅड मोठे असून, अमृतादेखील याचा आनंद घेणार आहे. त्यासाठी, खास जागतिक महिला दिनाचा आठवडा तिने निवडला असून, तिच्या महिला चाहत्यांसाठी पुढील सात दिवस ती वुमन्स डे वीक स्पेशल टिक टॉक करणार आहे.
या खास महिला दिन विशेष आठवडा 'टिक टॉक' दरम्यान अमृता ब्युटीविषयक टिप्स आणि तिचे काही सिक्रेट्स लोकांसमोर मांडणार आहे. मुंबईत लवकरच होत असलेल्या ग्राजीया ब्युटी फेस्टमध्ये अमृताची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे, या ब्युटी फेस्टच्या निमित्ताने अमृताचे ब्युटी सिक्रेट्स 'टिक टॉक' च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे.
https://www.instagram.com/p/Buf6nOkFuyo/
@amrutakhanvilkar1123 असे तिच्या अकाउंट्सचे नाव असून, अल्पावधीतच त्याला सर्वाधिक प्रसिद्धीदेखील मिळू लागली आहे.