By  
on  

Video : प्रथमेश परब म्हणतोय, डार्लिंग येनार राडा व्हनार !!!

अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याचा आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. डार्लिंग असं ह्या नव्या को-या सिनेमाचं नाव आहे. 

‘टाइमपास’, ‘टकाटक’ या गाजलेल्या चित्रपटानंतर प्रथमेश लवकरच डॉक्टर डॉक्टर आणि डार्लिंग या चित्रपटात झळकणार आहे. यापैकी डॉक्टर डॉक्टर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे डार्लिंग या चित्रपटातला प्रथमेशचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आय लव्ह यु बोल ना, म्हणतेय बघा डार्लिंग, होऊ द्या काय बी, आता भावड्या करणार डेअरिंग. डार्लिंग येनार राडा व्हनार !!! #Darling #7Jan2021 Coming To Theatres Near You New Year, New Hope, New Beginning #MissionBeginAgain #पुनश्चहरीओम A Film By: @sameer_asha_patil A Chinar & Mahesh Musical 7 Horse Entertainment Pvt Ltd And V. Patke Films in association with Kathakar Motion Pictures @shrotriritikaofficial @prathameshparab @nikkhhil_29 @chinarkharkar @ogalemaheshofficial @ajaythakur.14 @pickleentertainmentandmediapvt @vizualjunkies #vrgmedia @santoshsharma1022 @ganeshsharma0308gmail.com3

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab) on

समीर पाटील दिग्दर्शित ‘डार्लिंग’ या चित्रपट प्रथमेश मुख्य भूमिका साकारत असून अभिनेत्री रितिका श्रोत्री त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी रितिका आणि प्रथमेशने ‘टकाटक’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा डार्लिंगच्या निमित्ताने ही जोडी एकत्र येणार आहे.

‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघे-या’ या सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील ‘डार्लिंग’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरणार आहेत.

‘डार्लिंग’  हा चित्रपट ७ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive