By  
on  

अखेर समांतर मधील ‘ती’चं रहस्य उलगडलं, पाहा कोण आहे ही अभिनेत्री

'समांतर' या वेब सिरीजने लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. सुहास शिरवाळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित या वेबसिरीजमधील गुढकथेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अभिनेता स्वप्निल जोशी, तेजिस्विनी पंडित, नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाने सिरीज अधिक रंगतदार केली. 

सिरीज एका रंजक वळणावर असताना सीझन एंड झाला. पहिल्या भागात एका बाईचाही उल्लेख करण्यात आला होता. आणि ती बाई कोण हे त्या भागात समजू शकलं नव्हतं. हीच बाई आता समांतरच्या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.  समांतरमध्ये ती बाई कोण साकारणार याचा उलगडा आता झाला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर समांतरमध्ये त्या बाईची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक आता सई, स्वप्नील आणि तेजस्विनीमधील केमिस्ट्री पाहण्यास पुन्हा उत्सुक असतील यात शंका नाही.

 

(सौजन्य: मुंबई टाईम्स)

Author

Recommended

PeepingMoon Exclusive