By  
on  

‘सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर’ च्या निमित्ताने सुजय डहाकेने साधला प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद

सध्या वेबसिरीजचा बोलबाला सर्वत्र आहे. दिग्दर्शक सुजय डहाकेनेही वेबसिरीजच्या या विश्वात सेक्स, ड्रग्ज अँड थिएटरद्वारे पदार्पण केलं आहे. सहा कॉलेज मित्र-मैत्रिणींची कथा या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसिरीजमध्ये प्रवीण तरडे, सुनील बर्वे, अदिश वैद्य, मिताली मयेकर, सुयश झांजुर्के, शाल्व किंजवडेकर, नयना मुके, अभिषेक देशमुख आणि सुजय डहाके यांचा अभिनय पाहता येईल.

प्रवाहाबाहेर जाऊन केलेला प्रयोग म्हणजे ‘सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर’ असं म्हणता येईल. हे मत दिग्दर्शक सुजय डहाकेने व्यक्त केलं आहे. यावेळी ‘सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर’ची टीमही उपस्थित होती.

त्याशिवाय झी फाईव्हचे बिझीनेस हेड मनिष अगरवाल, प्रोग्रॅमिंग हेड अपर्णा आचरेकर हे देखील उपस्थित होते.  एका प्रतिष्ठीत कॉलेजातील तरुणांभोवती याची कथा फिरते. एकांकिका स्पर्धा, नाटक, एकमेकांबद्दल आकर्षण, प्रेम, ईर्षा तर कधी ताण घालवण्यासाठी व्यसनांचा घेतलेला आधार याभोवती ही कथा फिरत राहते.

5 मार्चपासून झी5 वर ‘सेक्स,ड्रग्ज अ‍ॅण्ड थिएटर’ ही वेबसिरीज पाहता येणार आहे

 

Recommended

PeepingMoon Exclusive