सोशल मिडीयाच्या माध्यमातून हल्ली सेलिब्रिटी चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन करतात. त्यांची ऑफस्क्रीन धम्माल-मस्ती असं सर्व काही रसिकांना पाहायला आवडतं. रोज भेटीस येणा-या लाडक्या मालिकांमधले कलाकार तर प्रेक्षकांना आपलेसेच वाटतात.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचंसुध्दा असंच आहे. ह्या प्रसिध्द मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने रसिकांच्या मनावर गारुड केलं आहे. सर्वांची लाडकी आई म्हणजेच अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नुकतंच मधुराणीने इन्स्टाग्रामच्या रील फिचरचा पहिला-वहिला व्हिडीओ चाहत्यांशी शेअर केला आहे. ह्यात तिने तिची ऑनस्क्रीन लेक ईशासोबत एक गाणं गायलंय.
‘हम आपके है कौन’ सिनेमातलं माईन माईन...हे सुंदर गाणं ईशा आणि अरुंधतीच्या आवाजात ऐकणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे.
तुम्हालासुध्दा ह्या ऑनस्क्रीन मायलेकींचा हा व्हिडीओ नक्की आवडेल, यात शंका नाही.