By  
on  

दिग्दर्शक रवी जाधव यांनी केला नव्या प्रोजेक्टचा श्रीगणेशा

मराठी सिनेमांचे प्रसिध्द दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांनी आपलं अढळ  स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं आहे. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास-२’, ‘न्यूड’ असे एकापेक्षा एक सिनेमे रसिक प्रेक्षकांना देणारे रवी जाधव आता एक निर्माते म्हणूनही ओळखले जातात. त्यांची निर्मिती असलेल्या एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट 'अनन्या'  सिनेमाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांसमोर येतेय.

लॉकडाऊननंतर आता रवी जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या नव्या प्रोजेक्टचा श्रीगणेशा केला आहे. नवा-कोरा सिनेमा घेऊन ते लवकरच प्रेक्षकांसमोर येतायत. पण हा नेमका सिनेमा कोणता त्याचा विषय काय याबाबतची माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

रवी जाधव यांनी सिनेमाच्या सेटवरचा गणेशपूजनाचा फोटो पोस्ट करत आपण नव्या सिनेमाच्या तयारीला लागल्याचं चाहत्यांना कळवलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नवा प्रोजेक्ट. गणपती बाप्पा मोरया #start #fun #magic #movie #newproject

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

 

चाहत्यांसह संपूर्ण सिनेसृष्टीत रवी जाधव यांच्या आगामी सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive