By  
on  

अमेय वाघचा हा व्हिडीओ पाहून राहुल देशपांडे खळखळून हसले

 नेहमीच भन्नाट पोस्ट करत चाहत्यांना धक्का देणा-या अमेयने आता पण एक भन्नाट पोस्ट केली आहे. पठठ्याने चक्क शास्त्रीय संगीत गात चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. हे ऐकून तुन्ही विचारात पडलात ना...पण खरी गंमत तर व्हिडीओमध्ये आहे. 

अमेय त्याच्या मिश्कील शैलीत सांगतोय, "राहुल देशपांडे ह्यांच्या सारखं गाणं तर कोणालाही अशक्यच पण त्यांच्या गाण्यावर lipsync करणं पण अवघड ! ह्या प्रयत्नासाठी मला १० पैकी किती मार्क्स ?? जरा खुल्या दिलानं मार्क्स द्या" 

अमेयच्या ह्या धम्माल व्हिडीओवर राहुल देशपांडे यांनीसुध्दा खळखळून हसत दाद दिली आहे. तर त्याच्या ह्या व्हिडीओवर  नेटिझन्सनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

 

 

अमेय लवकरच आगामी 'झोंबिवली' या हॉरर-कॉमेडीपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय 'वाघाचा स्वॅग'  या अमेयच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनसुध्दा तो रसिकांचं मनोरंजन करत असतो. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive