By  
on  

ऋषी सक्सेनाकडून गर्लफ्रेंड ईशा केसकरला मिळाल्या रोमॅण्टीक शुभेच्छा

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना यांच्याबद्दल जाणून घ्यायला त्यांचे फॅन कायमच उत्सुक असतात. अलिकडेच त्यांच्या नात्याला दोन वर्षं पूर्ण झाली. आधी जय मल्हार मालिकेतून बानू बया म्हणून ईशा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. त्यानंतर माझ्या नव-याची बायको मालिकेतून शनाया म्हणूनही ती रसिकांना आवडली. तर तिचा बॉयफ्रेंड अभिनेता ऋषी सक्सेनाने काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून रसिक प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. 

 

 

आज ईशाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दोघांचा एक रोमॅण्टीक फोटो शेअर करत ऋषीने तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.  ईशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जाते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday bub ️

A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official) on

 

 

ईशाने उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या चित्रपटात देखील काम केले आहे.  तर ऋषी लवकरच लॉकडाऊनंतर परदेशात चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा छुमंतरमध्ये प्रमुख भूमिकेत झळकतोय. 

 सध्या ईशा आणि ऋषी मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांचे आवडते कपल असल्याचे देखील म्हटले जाते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive