By  
on  

आदिनाथ कोठारेने त्याच्या आयुष्यातील खास ‘लेडी’ला वुमन्स डेच्या दिल्या अशा शुभेच्छा

अदिनाथ आणि उर्मिला कोठारे हे मराठी सिनेसृष्टीतील सुपर क्युट कपल आहे. या कपलच्या आयुष्यात मुलगी जिजाचा प्रवेशही झाला आहे. आतापर्यंत पडद्यावर हिरो असणारा आदिनाथ ‘बापमाणूस’ होणं मात्र खुप एंजॉय करताना दिसत आहे. आदिनाथने अलीकडेच मुलगी जिजाला जागतिक महिला दिनाच्या हटके शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडिओ त्याने नुकताच शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/Busg4K0h1Gf/?utm_source=ig_web_copy_link

यात आदिनाथ जिजाला कांगारू सॅकमध्ये ठेवून अमेरिकन बॅण्ड मरून  5 च्या ‘गर्ल्स लाईक यु’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘तुला विश करण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही त्यामुळे तुला आधीच वुमन्स डे च्या शुभेच्छा’.

https://www.instagram.com/p/Bt26VNthGVI/?utm_source=ig_web_copy_link

जिजा आणि आदिनाथची जोडी या व्हिडिओत सुपरक्युट दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive