By  
on  

‘वजनदार’ सिनेमाला झाली 4 वर्षं पुर्ण, चिराग पाटीलने शेअर केला हा फोटो

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांची धमाल केमिस्ट्री असलेला सिनेमा म्हणजे ‘वजनदार’. या सिनेमाने नुकतीच चार वर्षं पुर्ण केली आहेत. या सिनेमातील अभिनेता चिराग पाटील याने पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

 

 

 
या सिनेमासाठी प्रिया आणि सईने तब्बल 10 ते 12 किलो वजन वाढवलं होतं. या सिनेमात चिरागने ओंकार जाधव ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘या सिनेमाने अनेकांच्या दृष्टिकोनात आणि समाजाच्या मापदंडात बदल केला. 
‘वजनदार’ सिनेमाची कथा सर्वसाधारण असली तरी आपल्यातील न्यूनगंडावर आपणच मात करायला हवी हे शिकवणारी आहे. तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात. तुमचं सौंदर्य हे तुमच्या स्वभावात दडलेलं आहे, हे हा सिनेमा शिकवून जातो.

Recommended

PeepingMoon Exclusive