By  
on  

Photo : गर्लफ्रेंडकडून अमेय वाघला मिळाल्या रोमॅण्टिक शुभेच्छा

आज वाघांच्या अमेयचा वाढदिवस आहे. अभिनेता आणि आपल्या हजरजबाबी विनोदी वृत्तीसाठी प्रसिध्द असलेल्या अमेयवर सर्व चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण यात एका हटके शुभेच्छांनी लक्ष वेधलं आहे. अमेयला त्याच्या गर्लफ्रेंडकडून खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. 

अमेयची ही गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नसून आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेल्या गर्लफ्रेंड या सिनेमाने मागच्यावर्षी बॉक्स ऑफीस गाजवत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. एखादा इंट्रोव्हर्ट मुलगा ‘गर्लफ्रेंड’ च्या शोधात असेल तर काय गंमती-जमती घडतात याचा मनोरंजक प्रवास

सईने अमेयला शुभेच्छा देताना म्हटलंय, वाघाचा स्वॅग असाच वाढत राहो. नेहमी चमकत राहा. पुढील वाटचालीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा !

यासोबतच सईने दोघांचा एक क्युट फोटोसुध्दा शेअर केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive