By  
on  

शशांक केतकर रमलाय स्वयंपाकघरात, पाहा व्हिडियो

सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु आहे. दिवाळी आपल्यापरीने खास बनवण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेतो आहे. स्वयंपाकघरातही नवीन फराळाच्या पदार्थाचे बेत बनत आहेत. अभिनेता शशांक केतकरनेही फराळ बनवण्यास हातभार लावला आहे. शशांकने सोशल मिडियावर शेव बनवतानाचा व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

अर्थात परफेक्ट शेव जमलेली पाहताचा त्याचा चेह-यावर आनंद दाटून आला आहे. शशांकच्या या कौशल्याचं चाहत्यांनीही कमेंटमधून कौतुक केलं. शशांक अलीकडेच ‘हे मन बावरे’ मधील सिद्धार्थच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शशांक आता कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो याची उत्सुकता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive