By  
on  

‘ऐतिहासिक सिनेमा ‘फत्तेशिकस्त’ची वर्षपूर्ती

इतिहासाच्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची शौर्यगाथा सांगणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमा मागील वर्षी 15 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. 'फत्तेशिकस्त' ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या सिनेमाने नुकतंच वर्षं पुर्ण केलं असून सिनेमातील कलाकारांनी पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

 

 

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधील एक शौर्यपर्व या सिनेमातुन प्रेक्षकांना पाहायला मिळालं. महाराजांनी पुण्यातील लाल महालात जाऊन शाहिस्तेखानाची तोडलेली बोटं जणू काही स्वराज्याचा पहिला सर्जिकल स्ट्राईकच होता. एक वेळ तू हिरावून घेवू शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेवू शकत नाहीस ... आमचं स्वराज्य ..या सिंहगर्जनेला आज १ वर्ष पूर्ण झाले!
फत्तेशिकस्त ...... वर्षपूर्ती!!

 

 

फत्तेशिकस्त ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही तुम्हा रसिकांचे सदैव ऋणी राहू’. हे कॅप्शन देत  कलाकारांनी वर्षं पुर्तीचा आनंद शेअर केला आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकीत मोहन, मृण्मयी देशपांडे हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसले.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive