By  
on  

‘हिरकणी’च्या शौर्याचा थरार पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार

शिवरायांच्या इतिहासात अनेक नावं आहेत जी सुवर्णाक्षरात लिहिली जातील. पण या इतिहासात एक ‘हिरकणी’ अशीही आहे जी स्वत:च्या तेजाने झळकते.  याच हिरकणी गोष्ट दिग्दर्शक प्रसाद ओक पडद्यावर घेऊन आले होते. 
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं नाव कमावलं. रायगडाचे दरवाजे  सूर्यास्तानंतर बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी काळोखात गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणारी हिरकणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. मागील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

 

 

पण आता पुन्हा एकदा तो थिएटरमध्ये झळकणार आहे. सोनालीने एक पोस्ट शेअर केली आहे. याबाबत सोनाली म्हणते, ‘ “पुन्हा बुरुज उतरून दाखवा" असं जेव्हा महाराज हिरकणी ला म्हणाले... तेव्हा तिची द्विधा मनस्थिती झाली... पण आज या कठीण काळानंतर जेव्हा "थिएटर्स पुन्हा उघडली" आहेत... तेव्हा आपली "हिरकणी" थिएटर्स चे बुरुज सर करण्याचं आव्हान पेलायला तय्यार आहे.

 तुमचे आशीर्वाद हीच आमची "कोजागिरी" सिनेमा पुनः प्रदर्शित होण्याचा मान आजपर्यंत काही निवडक चित्रपटांनाच मिळालाय... त्या पंक्तीत आज "हिरकणी" जाऊन बसली ते केवळ तुम्हा प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळेच... भोवतालचा हा निराशाजनक अंधार दूर सारण्यासाठी "हिरकणी' चा हा प्रेरणादायी प्रवास चित्रपटगृहात येऊन जरूर अनुभवा...!!! जय भवानी... जय शिवराय...!!!’ प्रेक्षकही हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहायला उत्सुक असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive