By  
on  

व्हिडियो शेअर करत आशाताई म्हणतात, ‘मी दृष्ट काढते’

दिवाळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्याचे सोहळे रोजच रंगताना दिसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवाळीला प्रत्येकजण एकमेकांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्येच गायिका आशा भोसले यांनीदेखील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

आशाताई आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘‘या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा, दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या नव-वर्षात तुम्हा सर्वांच्या चिंता, दु:ख दूर होतील. आणि तुम्ही सगळे सुखी व्हाल अशी मी देवाकडे प्रार्थना करते. एखादी आई जशी आपल्या मुलाचं औक्षण करते, त्याची दृष्ट काढते तशीच मी तुम्हा सर्वांची दृष्ट काढत आहे. शुभ दिपावली.’ असं म्हणत त्यांनी व्हिडियो शेअर केला आहे. हा व्हिडियो पाहून अनेकांनी आशा ताईंच्या व्हिडियोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive