चार वर्षांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे ह्यांनी सुरू केलेल्या तेजाज्ञा ह्या डिझाइनर ब्रॅंडला आता चार वर्ष पूर्ण होतायत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ह्या डिझाइनर ब्रॅन्डला आपली कधी जाहिरात करायची गरज पडली नाही पण ‘वुमन्स डे’चे औचित्य साधून तेजाज्ञा ब्रॅन्ड आपली पहिली अॅड फिल्म घेऊन आलेत.
तेजस्विनी पंडित ह्या अॅड फिल्मविषयी म्हणते, “तेजाज्ञा ब्रँड आपल्या वेगवेगळ्या डिझाइनर आटफिट्स आणि साड्यांव्दारे वुमनहुडला नेहमीच सेलिब्रेट करतो. पण स्त्रीत्वाला वुमन्स डेच्या निमित्ताने आम्ही ह्या नव्या अॅड फिल्मव्दारे ट्रिब्युट दिलंय. महिला दिनी स्त्रीच्या सशक्तीकरणाचे संदेश देणारे व्हिडीयो करण्यापेक्षा आम्ही स्त्रीत्वाला आमच्या आगळ्या कलात्मक पध्दतीने दिलेली ही आदरांजली आहे.”
तेजाज्ञाच्या ह्या व्हिडीयोमध्ये 6 वर्षाच्या लहान मुलीपासून 60 वर्षांच्या वयोगटातल्या स्त्रियांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि क्षेत्रातल्या स्त्रिया दाखवल्या आहेत. तेजस्विनी पंडित ह्याविषयी म्हणते, “सेवानिवृत्त शिक्षिका, ते गृहिणी, डॉक्टर, पोलिस, डिझाइनर, नृत्यांगना, आणि शाळेत जाणारी छोटुकली चित्रकार अशा वेगवेगळ्या आवडी जोपासणा-या वेगवगेळ्या माध्यमांमधल्या स्त्रियांना आम्ही ही मानवंदना दिली आहे.”
https://twitter.com/tejaswini_tweet/status/1103922072407797762
ह्या व्हिडीयोमध्ये तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावेसोबतच हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे, स्नेहलता तावडे, सुखदा खांडकेकर, सुहासिनी देशपांडे, गार्गी जोशी आणि ज्योती चांदेकर हया अभिनेत्रींनी दिसून येत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पहिल्यांदाच तिच्या आई ज्योती चांदेकरसोबत एका अॅड फिल्ममध्ये काम केले आहे.
https://youtu.be/RjnxgWFBRfM