By  
on  

साज ह्यो तुझा.....साडीत दिसला रिंकू राजगुरुचा जबरदस्त स्वॅग !

सैराटची आर्ची म्हणून अभिनेत्री रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचली. पदार्पणातील सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आज तिचा असंख्य मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अनेक नव्या प्रोजेक्टसमधून रिंकू चाहत्यांच्या भेटीला येते. तिच्या प्रत्येक सिनेमाची उत्कंठा  चाहत्यांमध्ये कायम असते. 

सोशल मिडीयावर रिंकूची खुप मोठी क्रेझ  आहे. तिचे अनेक फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते आणि क्षणार्धात ते व्हायरल होतात. 

 

दिवाळीच्या या  फेस्टिव्ह  सीझनमध्ये रिंकूने खास साडीतलं एक छानसं फोटोशूट पोस्ट केलं आहे.  रिंकूने लॉकडाऊनंनतर परदेशात चित्रित होणारा पहिला  मराठी सिनेमा छूमंतरमध्ये झळकतेय. या सिनेमाचं लंडनमधलं शूटींग पूर्ण करुन ती अलिकडेच भारतात परतलीय. 

 

 

 

बंगाली पध्दतीच्या या साडीत रिंकू खुपच भारी दिसतेय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive