By  
on  

‘माहेरची शेवटची दिवाळी’ म्हणत सोनालीने पोस्ट केला हा सुरेख फोटो

मराठी सिनेमाची अप्सरा सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या वाढदिवसादिवशी साखरपुड्याची गोड बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. सोनालीने फेब्रुवारीला कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला. यादरम्यान सोनालीने साखरपुड्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते.  

 

 

याशिवाय नुकतंच तिने पुढील दिवाळी सासरी साजरी करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच सोनालीच्या घरी पुढील वर्षी सनई चौघडे वाजणार असल्याचं आता सगळ्यांना समजलं आहे.  त्यामुळे भावी नवरी सोनालीने यावर्षीची दिवाळी माहेरी धुमधडाक्यात साजरी केली आहे. माहेर ची शेवट ची दिवाळी म्हणत सोनालीने कुटुंबासोबतच फोटो शेअर केला आहे. चाहत्यांनी अर्थातच सोनालीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive