By  
on  

Video : गौतमीच्या सुरेल स्वरांनी सजलं एव्हरग्रीन रेखा यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं

'माझा होशील ना' मालिकेतील सई आणि आदित्यची कहाणी प्रेक्षकांना आवडतेय. या कहाणीत अनेक ट्विस्ट आणि टर्न येताना पाहायला मिळतात. सई आणि आदित्यच्या प्रेमामध्ये मामांची भूमिका महत्त्वाची ठरतेय. एकूणच हा सर्व गोतावळा पाहायला रसिकांना खुप धम्माल येतेय. मालिकेतली सई बिराजदार जशी बिनधास्त-बेधडक आहे तशीच काहीशी ख-या आयुष्यातली अभिनेत्री गौतमी देशपांडेसुध्दा आहे. 

गौतमी मालिकेत जितकी मनमौजी दिसते, तशी ख-या आयुष्यात आहे. गौतमीला गाण्याची प्रचंड आवड आहे. ती गाणं शिकलीसुध्दा आहे. नुकतंच दिवाळीच्या निमित्ताने गौतमीने एक खास गाण रसिकांसाठी सादर केलं आणि सोशल मिडीयावर ते शेअर केलं. 

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखावर चित्रित करण्यात आलेल्या दिल चीज क्या है... प्रसिध्द.गाणं गौतमीने गायलं. तसंच हे गाणं सादर करताना गौतमीने खास पारंपारिक ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे हे गाणं ऐकण्यासोबतच त्याचं सादरीकरण पाहायाला तुम्हाला खुपच आवडेल. 

 

 

 

 

गौतमीच्या सुरेल स्वरांनी सजलेल्या ह्या प्रसिध्द गाण्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive