By  
on  

दिवाळीचा सुरेख किल्ला साकारताना देवदत्त नागे यांनी व्यक्त केली ही खंत

दिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहतोय.  रांगोळी, कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे किल्ले. अंगणातील किल्लाही दिवाळी सणाचा अविभाज्य घटक आहे. मोठ्यांच्या मदतीने अंगणात बच्चेकंपनींची मातीच्या किल्लयाची लगबग हे चित्र आज लोप पावत चाललं आहे. 

महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगात महत्त्व कमी होताना दिसतंय. म्हणूनच मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतले प्रसिध्द अभिनेते देवदत्त नागे यांनी आपल्या घराच्या अंगणात साकारलेली महाराजांच्या किल्ल्याची मातीची प्रतिकृती सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी शेअर केली आहे. 


 

महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमच्या पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके आहेत. या गडकोटांच्या आणि पूर्वजांच्या   स्मृती जपाव्यात हाच संदेश या किल्लेबांधणीतून आजच्या पिढीला देण्यात येतो. 

जय मल्हार मालिकेतले खंडेराय आणि आता डॉक्टर डॉन मालिकेतला देवा म्हणून अभिनेते देवदत्त नागे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेत. त्यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत किल्ल्याच्या मातीच्या प्रतिकृतीचे फोटो  शेअर केले.  देवदत्त हे मूळचे निसर्गरम्य अलिबागचे आहेत. त्यांनी आपल्या घराच्या अंगणात हा सुरेख किल्ला साकारला,  सोबतच त्यांनी एक खंतसुध्दा व्यक्त केली. 

ते म्हणतात,  खंत ह्याची क़ी दिवाळी चे किल्ले” ह्या पेक्षा “Halloween” चे pics जास्त बघायला मिळाले)

 

देवदत्त नागे  यांच्या या किल्ल्याच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive