By  
on  

अपूर्वा नेमळेकरने शेअर केला पझेसिव्ह गर्लफ्रेंडचा हा घायाळ करणारा VIdeo

रात्रीस खेळ चाले भाग २ ही  मालिका ख-या अर्थाने गाजली ती अण्णा-शेवंता यांच्या केमिस्ट्रीमुळे. आपल्या मादक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचलीय. 

 रात्रीस खेळ चाले- २ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण लगेचच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन केलं. झी युवा वाहिनीवरील मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये अपूर्वा पम्मी ही जबरदस्त भूमिका साकारतेय. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या अपूर्वाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे, ती तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी चाहत्यांशी शेअर करते. नुकतंच एका पझेसिव्ह गर्लफ्रेंडचे हावभाव एका सुंदर अशा गाण्यातून अपूर्वाने सादर केले. 

 

 

'लगान' सिनेमातलं गाजलेलं गाणं , मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले... ह्यावर अपूर्वाने घायाळ करणारा रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

 

अपूर्वाच्या ह्या घायाळ करणा-या अदा पाहून चाहते फिदा नाही झाले तरच नवल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive