By  
on  

आदित्य फेम विराजसला झाली होती करोनाची लागण, शेअर केला अनुभव

‘माझा होशील ना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला कलाकार म्हणजे विराजस कुलकर्णी. विराजस साकारत असलेली आदित्यची भूमिला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विराजस अनेकदा शुटिंग दरम्यानचे गमतीदार क्षण सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. पण आता त्याने खास बाब चाहत्यांशी शेअर केली आहे. विराजला काही दिवसांपुर्वीच करोनाची लागण झाली होती.

 

 

त्याने करोनाच्या लढ्याचा अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये विराजस म्हणतो, ‘Hey guys... मागचे १० दिवस २ गोष्टी झाल्या - एक म्हणजे मी social media वरून गायब झालो होतो, आणि दुसरं - तुमच्या सगळ्यांच्या DM आणि comments चा भडिमार होत होता...

सगळ्यांना उत्तर देणं शक्य नव्हतं. But as many of you guessed, I was found Covid positive last week (so technically ३ गोष्टी झाल्या) पण tension घ्यायचं काही कारण नाही. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय, आणि नशिबाने सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो. दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली, पण आता पुन्हा shooting साठी सज्ज झालो आहे, आणि आपण TV var आणि इथे भेटत राहूच. A huge thanks to all of you, my Doctors, and my MHN team for their support. तुम्ही असाच support करत रहा, आणि माझा होशील ना enjoy करत रहा!’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive