By  
on  

जिजाला तिच्या अंंगणात भेटला हा गोड दोस्त, पाहा हा व्हिडियो

कोठारे घराण्यातील सर्वात लहान सदस्य म्हणजेच उर्मिला व आदिनाथ कोठारे यांची लाडकी लेक जिजा कोठारे. क्युट जिजाचे अनेक फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आताही जिजाच्या बाबाने म्हणजेच आदिनाथने एक गोड व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

या व्हिडियोमध्ये निरागस जिजा कबुतराशी बोलताना दिसते आहे.  जिजा कबुतराला तांदळाचे दाणे खायला देत असून त्याच्याशी गप्पा मारते आहे. तू शिजलेला भात खाणार का असा प्रश्नही कबुतराला विचारते आहे. यासोबत बाबा, तो माझ्याशी बोलत नाही अशी लाडीक तक्रारही करते आहे. जिजाच्या या व्हिडियोवर तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर, सुकन्या मोने, राकेश बापट या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive