पोपटी पार्टीची मज्जा काही औरच असते. गावाला मडक्यात पोपटी लावणं काय असतं हे आजच्या पिढीला खरंतर समजावून सांगण्यासाखीच गोष्ट आहे.म्हणूनच मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री किशोररी शहाणे-वीज यांनी पोपटी लावून त्याचा खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
किशोरी शहाणे या सध्या त्यांच्या गिरीवन हिल्स येथील फार्म हाऊसवर आहेत. तेव्हा त्यांनी त्यांच्या पतीसोबत मिळून मस्त पोपटी लावली आणि त्याचा मनसोक्त आस्वाद घेत पोपटी पार्टी केली.
पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो. बटाटे, शेंगा, अंडी, चिकन असे विविध पदार्थ पोपटीमध्ये भाजून खायला मजा येते.
किशोरी शहाणे यांच्या ह्या मस्त व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.