By  
on  

या मराठी अभिनेत्रीने केली जुही चावलासारखी स्टाईल

मराठी अभिनेत्री सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या प्रोजेक्टबद्दलचे विविध अपडेट्स त्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवतात. पण याचसोबत अभिनेत्रींना  आपले विविध सुंदर लुक चाहत्यांशी शेअर करायला प्रचंड आवडतं. 

मराठी सिनेसृष्टीतील गुलाबाची कळी म्हणजेच गुणी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. तिच्या क्लोदिंग ब्रॅण्डससोबतच इतर लुक्समधले फोटोसुध्दा ती पोस्ट करते. नुकतंच तेजस्विनीने एक गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर  केला आहे. यात तिने चक्क बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सारखी कर्ल्सवाली हेअरस्टाईल केलीय. 

एका कार्यक्रमाच्या शूटींग दरम्यान मेकअप रुममध्ये तेजस्विनीने हा सुंदर सेल्फी काढलाय.

 

 

चाहते तिच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करतायत. इतकंच नाही तर अमृता खानविलकरने हायला... जुही चावलाच अशी कमेंट तेजस्विनीला केली आहे. तर सिध्दार्थ जाधव म्हणतो, मला जुही चावला खुप आवडते.  

 

एकूणच तेजस्विनीच्या या फोटोला लाईक्ससोबत धम्माल कॉमेंट्सही येतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive